News Cover Image

डाॅ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले

डाॅ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वाचनाचे व्यासंगी, क्रीडाप्रेमी, आरोग्यदुत, देवमाणुस, दिनदुबळ्यांचा आधारवड, निसर्गप्रेमी, डाॅ. विजयजी बिडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर एम होते. याप्रसंगी डाॅ. विजयजी बिडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पर्यवेक्षक श्री केला डी.जी.,उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील आर.एम. यांनी अापले मनोगत व्यक्त केले. यात डाॅ. साहेबांचे प्रेरणादायी कार्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी किती मौलिक आहे हे त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी डाॅ. साहेबांच्या विचाराचे अनुकरण करावे असे मत त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.