News Cover Image

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व  हुतात्मा दिन साजरा

डाॅ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व  हुतात्मा दिन साजरा
पेठ, ता. ३०- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल,पेठ येथे आज विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम यांच्या अध्यक्षतेखाली  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम म. गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पर्यवेक्षक श्री केला डी. जी., उपप्राचार्य श्रीमती पवार जे. पी. यांनी म.गांधी यांच्या जीवन व कार्याचा परिचय करुन दिला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाटील आर एम यांनी अध्यक्षीय मनोगतातुन म. गांधी यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. बरोबर ११.०० वाजता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण केली. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम, व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे उपप्राचार्य श्री वेढणे पी आर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.